Ad will apear here
Next
भयकथा आणि गूढकथा
रत्नाकर मतकरी हे मराठीतील नामवंत गूढकथालेखक. डॉ. कृष्णा नाईक यांनी ‘सावल्यांच्या प्रदेशात’ या पुस्तकातून रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेची समीक्षा केली आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला कथा या साहित्यप्रकाराची जडणघडण, तसेच गूढकथा आणि अन्य कथाप्रकारांचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत. 
.......
भयकथांमधील आशयसूत्र ‘भीती’ (Fear) हे असते. भीती ही एक भावना माणसाच्या मनाशी निगडित आहे. कोणत्याही व्यक्तीस नेमकी कोणत्या गोष्टीची भीती वाटेल याचे नेमके निदान करता येत नाही. सर्वसाधारण स्थितीत ‘भीती’ या भावनेस धमकी, धोका, दु:ख, इजा आदी कारणांनी मनात निर्माण होणारी क्लेशदायक भावना मानले जाते. याचा सरळ अर्थ असा होतो की, मनामध्ये ‘भीती’ ही भावना निर्माण होण्यासाठी मनाला क्लेशकारक ‘कोणते तरी’ कारण असले पाहिजे.

भीती म्हणजे ‘a feeling of anxiety concerning the outcome of something or the safety of someone.’ ‘भीती’ या भावनेच्या निर्मितीमागे ‘सुरक्षिततेचे’ कारण आहे. ‘भीती’च्या सर्वसाधारण व्याख्यांचा विचार केल्यास त्यांचा संबंध ‘मना’शी येत असल्याने मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून भीती या भावनेचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. 

मानसशास्त्रामध्ये ‘भीती’ या भावनेस ‘फोबिया’ म्हटले असून, फोबियाचे विविध प्रकार सांगितले आहेत. मानवी मनात ‘भीती’ या भावनेची निर्मिती होण्यासाठी ‘बाह्य कारणे’ निमित्त होतात. मानवी मनावर झालेले आघात (traumatic) भीती या भावनेस मानवी मनात जन्म देतात. तसेच काही वेळा मनात ‘अकारण’ कोणत्याही विशिष्ट बाह्य कारणाशिवाय ‘भीती’ ही भावना जन्म घेते. या ‘अनामिक भीती’ची कारणे शोधणे अवघड असते. भीती या भावनेच्या या दोन प्रकारांव्यतिरिक्त मानवी मनाच्या नेणिवेच्या स्तरात बंदिस्त असलेल्या श्रद्धा-विश्वासांमुळे निर्माण होणारी ‘भीती’ ही भावना स्वतंत्रपणे विचारात घ्यावी लागते. मानवी मनातील नेणिवेच्या स्तरावरील अनुभव, विश्वास, मते यांना तर्कशुद्ध आधार असतोच असे ठामपणे सांगता येत नाही. किंबहुना असा तर्कशुद्ध आधार नसल्यानेच भीतीची निर्मिती होते. तिची कारणमीमांसा देता येत नाही. परंतु व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनावर परिणाम मात्र होतो.

अशा प्रकारच्या भीतीचे मानसिक भीती, अतिमानुषतेमुळे निर्माण होणारी भीती, अस्तित्वाबद्दलची भीती, अपयशाची भीती, आदी विविध प्रकार मानले आहेत. मनुष्याच्या जन्मापासून ‘भीती’ ही भावना मानवी मनात असल्याने ‘भीती’ या भावनेचा आविष्कार भिन्न स्थितीत भिन्न स्वरूपात प्रकट होतो. साहित्य हे मानवी जीवनाशी निगडित असल्याने साहित्याच्या कोणत्याही प्रकारात ‘भीती’ या भावनेचे अस्तित्व कमी-अधिक प्रमाणात आढळते. ‘कथा’ हा साहित्यप्रकार त्यास अपवाद नाही. ज्या कथांचे आशयसूत्र ‘भय’ या भावनेभोवती गुंफलेले असते, अशा कथा ‘भयकथा’ या प्रकारात समाविष्ट केलेल्या आहेत. अशा भयकथा सर्व भाषिक वाङ्मयात लिहिल्या गेल्या आहेत. 

मानवी मनात अतींद्रिय शक्ती, भूत, पिशाच्च अशा अतिमानवी स्वरूपांची असलेली भीती बहुतांशी अनुभवास येत असल्याने, अशा भयकथांची बैठक प्रामुख्याने अशा अतींद्रिय, अतिमानुषतेवर आधारलेली आढळते.
 
(‘सावल्यांच्या प्रदेशात’ हे डॉ. कृष्णा नाईक यांचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZYMCI
Similar Posts
रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेचे अभिवाचन : ‘ऐक.. टोले पडताहेत’ ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या गूढकथा हा कायमच रसिकांच्या आवडीचा विषय होता.. ‘ऐक.. टोले पडताहेत’ या त्यांच्या कथासंग्रहातील त्याच शीर्षकाच्या कथेच्या, तनुजा रहाणे यांनी केलेल्या अभिवाचनाचा व्हिडिओ शेअर करत आहोत... ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातून..
स्वातंत्र्याची मोठी किंमत कलावंताला द्यावी लागते : रत्नाकर मतकरी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे नोव्हेंबर १९९८मध्ये भरलेल्या मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांनी भूषविले होते. त्या वेळी डॉ. सुधा जोशी यांनी मतकरी यांची घेतलेली मुलाखत त्या संमेलनाच्या ‘अमृतघन’ या स्मरणिकेत प्रकाशित झाली होती. त्यानंतर नवचैतन्य प्रकाशनातर्फे
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर... ‘रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?’ समकालीन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language